विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता सुरु आहेत. मात्र या काळात आचारसंहिता भंग होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात सांगलीत काँग्रेसकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहेत.
विशेष जयंत पाटील यांच्याविरोध मविआमधील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसने तक्रार दाखल केलीय. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी ही तक्रार देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. इस्लामपूरमध्ये शरद पवार गटाच्या कार्यालयाच्या मालकी हक्कावरून काँग्रेसकडून ही तक्रार दाखल केली आहे, असं सांगण्यात येत आहे. इस्लामपूरमध्ये शरद पवार गट आणि काँग्रेसमधील कार्यालयाचा वाद आता पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
आता याचप्रकारणी जयंत पाटील यांच्याविरोधात कारवाई कारण्यात यावी, म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.















Discussion about this post