मुंबई । एकीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना शिवसेना उद्धव ठाकरेंकडून तीन जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
या तीन जणांची पक्षातून हकालपट्टी
छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघामधून शिवसेना ठाकरे गटाचे किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण किशनचंद तनवाणी यांनी उमेदवारी नाकारली होती. यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर किशनचंद तनवाणी यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेचे (ठाकरे) भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख शंकर हिरामण मांडेकर यांची आणि महाड आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांची देखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे















Discussion about this post