तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण आयुक्तालयात नोकरी सुरु आहे. एकूण २९९ रिक्त पदांसाठी ही भरती सुरु असून या नोकरीसाठी तुम्हाला https://sjsa.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. ११ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ()
या पदांसाठी होणार भरती?
समाज कल्याण आयुक्तालयात लघुटंकलेखक (स्टेनो टायपिस्ट), लोवर ग्रेड स्टेनो, हायर ग्रेड स्टेनो, वॉर्डन, सोशल वेल्फेअर इन्स्पेक्टर, वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. स्टेनो टायपिस्ट पदासाठी उमेदवाराने १०वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याचसोबत त्याच्याकडे इंग्लिश आणि मराठी टंकलेखनाचे प्रमाणपत्र असायला हवे. इतर पदांसाठी अर्जदार हा कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही लेखी परिक्षेद्वारे केली जाणार आहे. उमेदवारांनी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यावी लागणार आहे. त्यानंतर उत्तीर्ण उमेदवरांची निवड केली जाणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १,००० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये शुल्क भरावे लागणार आहेत.















Discussion about this post