तुम्हीही सरकारी नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीद्वारे सीनियर रेजिडेंट, स्पेशलिस्ट, सुपर स्पेशलिस्ट ही पदे भरली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.
ESIC भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.
कर्मचारी राज्य विमा महामंडळात सीनियर रेजिडेंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष आहे. तसेच स्पेशलिस्ट आणि सुपर स्पेशलिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६९ वय असावे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन/डीएनबी/ डिप्लोमा केलेला असावा.सुपर स्पेशलिस्ट पदासाठी नेफ्रोलॉजी आणि न्युरोलॉजी पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. स्पेशलिस्ट पदासाठी उमेदवारांना १,२१,००० रुपये पगार मिळणार आहे तर सुपर स्पेशलिस्ट पदासाठी २ लाख रुपये पगार मिळणार आहे. (ESIC Job Recruitment)
ईएसआयसी भरतीमधील नोकरीसाठी लॉक इन इंटरव्ह्यूद्वारे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाताना आवश्यक कागदपत्रे घेऊन जा. या नोकरीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू २९ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे. या इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला २०७, दुसरा माळा, ईएसआयसी मॉडेल हॉस्पिटल, जयपुरस राजस्थान येथे उपस्थित राहायचे आहे.















Discussion about this post