मुंबई महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी पहिल्यांदाच आमनेसामने येणार असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. अशातच काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली. धंगेकरांनी एक्सवर पोस्ट शेअर करून काँग्रेसच्या दहा उमेदवारांची नावं जाहीर केली. परंतु, ट्वीट व्हायरल होताच धंगेकरांनी उमेदवारांच्या यादीची पोस्ट डिलीट केली.
काँग्रसेचे नेते रवींद्र धंगेकरांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं, परिवर्तनाच्या या लढाईत, शिलेदार आम्ही पहिल्या यादीचे..महाविकास आघाडी, काँग्रेस पक्ष व सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनापासून आभार…! दिल्लीश्वरााची कितीही ताकद येऊद्यात, हा कसबा जनतेचा आहे आणि राहणार…

धंगेकरांनी प्रसिद्ध केलेल्या यादीत विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्या उमेदवारांना संधी मिळाले आहे?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साकोली मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. विजय वडेट्टीवार )(ब्रम्हपूरी), बाळासाहेब थोरात (संगमनेर), दक्षिण कराडमधून पृथ्वीराज चव्हाण, अमित देशमुख (लातूर), यशोमती ठाकूर (तेओसा), ऋतुराज पाटील (दक्षिण कोल्हापूर), बाबा मिस्त्री (मध्य सोलापूर शहर), धर्मराज कडाडी (दक्षिण सोलापूर), तर रवींद्र धंगेकर कसबा पेठेतून विधानसभा निवडणूक लढणार आहेत.















Discussion about this post