तुम्हीही दहावी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. तब्बल ३९,४८१ रिक्त जागांवर ही भरती करण्यात येणार आहे. या भरतीअंतर्गत सेंट्रल आर्म्ड पोलिस फोर्सेस, सेक्रेटरिएट सिक्युरिटी फोर्स, कॉन्स्टेबर जीडी, आसाम रायफर्ल्स, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये शिपाई पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशनअंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये ३५,६१२ रिक्त पदे ही पुरुषांसाठी आहेत. तर ३,८६९ रिक्त जागा महिलांसाठी आहे. तर १० टक्के पदे ही माजी सैनिकांसाठी राखीव आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये १५,६५४ पदे रिक्त आहेत.सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्समध्ये ११,५४१ पदे रिक्त आहेत. सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्समध्ये ११,५४१ पदे रिक्त आहे. सीमा सुरक्षा बल पदासाठी ८१९ पदे रिक्त आहेत. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसमध्ये ३,०१७ पदे रिक्त आहेत. सेक्रेटरिएच सिक्युरिटी फोर्समध्ये ३५ पदे रिक्त आहे. आसाम रायफल्समध्ये १,२४८ पदे रिक्त आहेत.नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये २२ पदे रिक्त आहेत.
या नोकरीसाठी १०वी पास उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी १८ ते २३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. १५ ऑक्टोबर २०२४ ही नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये नोकरीसाठी उमेदवारांची निवड संगणक आधारित ऑब्जेक्टिव्ह परीक्षेद्वारे केली जाणार आहे. या परिक्षेत सामान्य ज्ञान, गणित, इंग्लिश/हिंदी हे विषय असणार आहे. तसेच शारीरिक क्षमता चाचणीदेखील होणार आहे. त्यानंतर शारीरिक मापदंड चाचणी परीक्षा द्यावी लागणार आहे. यानंतर वैद्यकीय तपासणी आणि कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे.
या नोकरीसाठी तुम्ही १४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करु शकतात. तसेच अर्जात बदल करायचा असेल तर तुम्ही ५ ते ७ नोव्हेंबरपर्यंत करु शकतात.या नोकरीसाठी तुम्हाला १८००० ते ६९००० रुपये पगार मिळणार आहे.















Discussion about this post