पाचोरा । घराची वास्तुशांतीच्या कार्यक्रम निमित्त भारतीय सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले जवान भूषण बोरसे सुटीवर आले होते. मात्र वडिलांना मदत करण्यासाठी शेतात गेले असताना अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली गाव शिवारात घडली.
पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खडकी येथील सुपुत्र भुषण आनंदराव बोरसे यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. भुषण बोरसे हे बिहार येथील मोतीहारी ७टि १बीएन बटालीय मध्ये सशस्त्र सिमा बलमध्ये कार्यरत होते. दरम्यान पाचोरा शहरातील नवीन कॉलेज मागील परिसरात त्यांनि घेतलेल्या नवीन घराची वास्तुशांतीचा कार्यक्रम नियोजित केला होता. यासाठी ते रजा घेऊन घरी आले होते. या दरम्यान ते दिवसभर परीवारासह पेडकाई माता या कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन आपल्या गावी आले.
याच वेळी अचानक पावसाची रीमझीम सुरू झाली. तेव्हा हातातील घड्याळ आणि मोबाईल विजेपासुन सुरक्षेच्या दृष्टीने घरी ठेवले. यानंतर ते दुचाकीने शेतात गेलेल्या वडीलांना मदतीसाठी धाव घेतली. याच वेळी विजेचा कडकडाट होत असताना वीज कोसळून वडीलांच्या अवघ्या १०० फुटांवर भुषण बोरसे यांच्या अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची वार्ता तालुक्यात पसरल्याने शोककळा पसरली.















Discussion about this post