मुंबई । “जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा जाहीर झाला. काश्मीरमध्ये इंडिया आघाडी जिंकली. मात्र हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपचे सरकार आले.दरम्यान हरियाणाच्या निकालानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. यावेळी राऊतांनी काँग्रेसवरच वार केला.
काय म्हणाले संजय राऊत?
“हरियाणाचा विजय फार मोठा महान विजय नाही. ठिकठिकाणी अपक्षांनी मत घेतली. जो जिंकतो सिकंदर अशी हिंदीमध्ये म्हण आहे. देवेंद्र फडणवीस हरियाणामध्ये गेले आणि विजय प्राप्त झाला असं काही होत नाही. मात्र काँग्रेस पक्षाला आता एक भूमिका घ्यावी लागेल स्वबळावर लढायचे असेल तर तशी त्यांनी भूमिका घेतली पाहिजे. हरियाणामधील पराभव दुर्दैवी आहे, त्यातून बरेच काही शिकता आले. कोणी कोणाला मोठा भाऊ छोटा भाऊ समजत नाही लोकसभेतला यश हे इंडिया आघाडीतले यश आहे, असं संजय राऊत म्हणाले.
“हरियाणा निकालातला कोणताही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. जम्मू काश्मीर निवडणुकीत ओमर अब्दुल्ला हा चेहरा होता लोकांनी त्याला मतदान केले. माझा नेता कोण? माझे नेतृत्व कोण करणार? या राज्याचा चेहरा कोणता हे स्पष्ट करावे. एकनाथ शिंदे चेहरा नव्हता भाजपने जाहीर करावा आमचे तीन चेहरे आहेत फडणवीस शिंदे अजित पवार निवडणूक लढावी पण त्यांनी जाहीर करावं,” असे आवाहनही संजय राऊत म्हणाले.















Discussion about this post