नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. ऑइल इंडियामध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. एकूण ४० पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. त्यामुळे तरुणांसाठी ही चांगली संधी आहे.
ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये लेखी परीक्षा नाबी तर वॉक इन प्रॅक्टिकल किंवा स्किल टेस्टच्याआधारे केली जाणार आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही चांगली संधी आहे.
ऑइल इंडियामध्ये इलेक्ट्रिशियन, मॅकेनिक (एसी आणि आर), असोसिएट इंजिनियर (इलेक्ट्रिकल) पदांसाठी ४० जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. २१ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
इलेक्ट्रिशियन पदासाठी १८ जागा रिक्त आहेत. मेकॅनिकसाठी २ जागा रिक्त आहेत. असोसिएट इंजिनियरसाठी २० रिक्त जागा आहेत.या नोकरीसाठी २० ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी निवड वॉक इन प्रॅक्टिकल/स्किल टेस्टद्वारे उमेदवारांची निवड केली जाते. या नोकरीसाठी वैयक्तिक मूल्यांकनाद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.















Discussion about this post