मुंबई : आदिवासी समाजातील आमदारांनी आज शुक्रवारी धक्कादायक निर्णय घेतला. धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देण्यास विरोध करत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार डॉ. किरण लहामटे, काशीराम पावरा, हिरामण खोसकर, राजेश पाटील आणि खासदार हेमंत सावरा यांनी मंत्रालयातील जाळीवर उड्या घेतल्या. या आमदारांना जाळीवरुन काढण्याचं काम सध्या मंत्रालयात सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज आदिवासी समाजातील आमदार आणि नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना एक तासाच्या प्रतीक्षेनंतर भेटले. यावेळी त्यांनी आरक्षण आणि अन्य मागण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. परंतु या चर्चेतून कोणताही ठोस निर्णय निघाला नाही. त्यापूर्वी त्यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची ही आदिवासी समाजातील आमदारांनी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये. ही मुख्य मागणी आदिवासी समाजातील आमदारांनी केली. परंतु यावर मुख्यमंत्र्यांनी कुठलंही ठोस उत्तर दिले नाही. त्यामुळे आपली मागणी मान्य व्हावी, यासाठी आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर चढून आंदोलन केलं.
दुसरीकडं आदिवासी समाजातील आमदारांनी आज आक्रमक भूमिका घेत मंत्रालयातील संरक्षण जाळीवर चढत आंदोलन केलं. यावेळी आदिवासी समाजातील अनेक आमदार होते. यात नरहरी झिरवाळ, भाजपाचे खासदार हेमंत सावरा यांचा सुद्धा या आंदोलनात सहभाग आहे. एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देऊ नये, म्हणून हे आंदोलन करण्यात आलं. जर धनगर समाजाला एसटी पर्वर्गातून आरक्षण दिले तर, आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही आदिवासी समाजातील आमदारांनी दिला आहे.















Discussion about this post