मुंबई । राज्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून अशातच शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्याच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलीय. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या कारला हा अपघात झाला. पोहरादेवीतून यवतमाळला जात असताना त्यांच्या कारला मध्यरात्रीअपघात झाला. राठोड यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला जोरदार धडक दिल्यामुळे अपघात झाला. यामध्ये सुदैवाने संजय राठोड बचावले आहेत. मात्र, पिकअपचा ड्रायव्हर जखमी झाला आहे.
मंत्री संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री आहेत. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळला येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोहरादेवीला नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. येथून परतत असताना संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात झाला.
संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात
पालकमंत्री संजय राठोड हे पोहरादेवी येथून रात्री 2 ते अडीच वाजेदरम्यान निघाले होते. ते पोहरादेवी येथून यवतमाळकडे जात होते. मात्र आर्णी येथील कोपरा गावाजवळ संजय राठोड यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला धडक दिली. हा अपघात खूप भीषण होता.अपघातात संजय राठोड यांच्या गाडीचे बरेच नुकसान झाले आहे. तर, पिकअप वाहन पलटी झाले. ज्यामुळे पिअकपचा चालक जखमी झाला. रात्री दोन ते अडीच वाजता ही घटना घडली.पिकअपच्या चालकाला पालकमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनानं उपचारासाठी यवतमाळला नेण्यात आलं आहे. पिकअपमधून केळीची वाहतूक सुरु होती. व्यापाऱ्याचं नुकसान टाळण्यासाठी रस्त्यावर पडलेली केळी दुसऱ्या गाडीत भरून ती पोहरागडला पाठवण्यात आली. या अपघातमध्ये संजय राठोड हे थोडक्यात बचावले आहेत. त्यांची प्रकृती ठीक आहे.















Discussion about this post