मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु असताना अशातच भाजपचे अनके नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करताना दिसून आले. आता अशातच आनखी एक मोठा नेता कमळ सोडून तुतारी हाती घेणार आहे. यामुळे भाजपला ऐन निवडणुकी तोंडावर मोठा धक्का बसणार आहे.
भाजपचे पुण्यातील इंदपूरमधील माजी आमदार हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी तुतारीचे स्टेटस ठेवण्यास सुरुवात केली आहे. तसेच हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी देखील तुतारीचे स्टेटस ठेवले आहे.
दुसरीकडे मुंबईत हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकीता पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या सिल्व्ह ओक या निवासस्थानी त्यांची ही भेट झाली. त्यात पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनीही पितृपक्षानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करु, असे म्हटले होते. त्यानंतर घटस्थापनेच्या पहिल्या दिवशीच हर्षवर्धन पाटील त्यांची कन्या अंकीता पाटील यांच्यासह शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवास्थानी पोहचले. त्या ठिकाणी शरद पवार यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. या चर्चेच्या वेळी सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.















Discussion about this post