तुम्हीही एअरपोर्टवर नोकरी शोधत असाल तर तुमच्यातही चांगली बातमी आहे. ग्लोबल एविएशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडने एअरपोर्ट फ्रेशर ग्राउंट स्टाफमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजेच या नोकरीसाठी १०वी आणि १२ वी पास उमेदवार अर्ज करु शकतात.
यामुळे पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०२४ आहे. यासाठी तुम्ही अभ्यर्थी नॅशनल करिअर सेक्शन (NCS)वर जाऊन अर्ज करु शकतात.
ज्या तरुणांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे त्यांच्यासाठी करिअरची सुरुवात करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. एअरपोर्ट ग्राउंड स्टाफमध्ये पॅसेंजर हँडलिंग स्टाफ, कार्गो सुपरवायजर, युटिलिटी, तिकीट हँडलिंग स्टाफ, लोडर या पदांसाठी भरती केली जाणार आहे.
एअरपोर्टवरील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३४ वर्ष असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २०,००० ते ३८,००० रुपये मानधन दिले जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.
ग्लोबल एविएशन सर्व्हिसेसच्या या भरतीमध्ये नॅशनल करियर सर्व्हिसच्या पोर्टलवर जाऊन अर्ज करु शकतात. ही मुलाखत कोलकत्ता येथे होणार आहे. या नोकरीबाबत अधिक माहिती नॅशनल करिअर सर्व्हिस या पोर्टलवर देण्यात आली आहे.















Discussion about this post