छत्तीसगडच्या नाइला रेल्वे स्थानकाजवळ भाजप नेते शेखर चंदेल यांचा मृतदेह आढळून आला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.
शेखर चंदेल हे माजी विरोधी पक्षनेते नारायण चंदेल यांचे धाकटे भाऊ असून राजकारणात सक्रिय होते. चंदेल यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात असून यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. याबाबत अधिक तपास सध्या सुरु आहे.
शेखर चंदेल आपल्या राईस मिलमधून पायी निघाले होते, असे सांगण्यात येत आहे. मोबाईलवर बोलत बोलत ते जात होते. याचवेळी रात्री शुक्रवारी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. त्यांनी घातेलेल्या शर्टावरुन त्यांची ओळख पटवण्यात यश आले आहे. मात्र ही हत्या आहे की आत्महत्या? याबाबतचा अधिक तपास सुरु आहे.
Discussion about this post