मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आली असून यातच सत्तेत असलेल्या महायुतीकडून मोठं मोठ्या घोषणा केल्या जात आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली.
काय म्हणाले अजित पवार?
आउटडेटेड झालेल्या योजना बंद करून चांगल्या योजना आणायच्या आहेत. जरी मी मुंबईला राहतो असलो तरी माझी उसाची शेती, पोल्ट्री आणि दुधाची डेअरी आहे. शेतकऱ्यांनी पुढचं बिल द्यायचं नाही, आणि मागचंही ही द्यायचं नाही. पुढील 15 दिवसाच्या आत पुढचं मागच्या बिल शून्य होणार आहे. तुम्ही महायुती सरकार आणा पुढील पाच वर्ष बिल द्यावं लागणार नाही, हा दादाचा वादा आहे,” असे आवाहनही अजित पवार यांनी केले. ते सोलापूरच्या मोहोळमधील जाहीर सभेत बोलत होते
यावेळी ते म्हणाले “इथे आलेल्या माझ्या माय माऊली काय देखण्या दिसतायत फोटो काढून घेतला पाहिजे. हे सगळ्यांना मिळत नाही, आपल्या बापजाद्यांनी कांही तरी कराव लागत तेंव्हा हे माय माऊलींचे प्रेम मिळते. अडीच लाखाच्या आतलं तुमचं उत्पन्न असेल तर उरलेल्या माय माऊलींच्या खात्यात ही पैसे जमा होतील, हा अजित दादाचा वादा आहे. मी इतके वर्ष सरकारमध्ये आहे पण आम्ही कांही केल नव्हतं, मोठ्यांच्या पोटी आणि सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येणाऱ्याला काय कळणार 1500 रुपयाची किंमत,” असा टोलाही अजित पवारांनी लगावला.
Discussion about this post