मुक्ताईनगर । शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी शक्ती प्रदर्शन केलं. खडसेंच्या बालेकिल्ल्यात रूपाली चाकणकर यांनी पायी रॅली काढत केले शक्तिप्रदर्शन. शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रूपाली चाकणकर यांचे भव्य स्वागत केले. यावेळी रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर टीका केली. स्वतःचं कर्तुत्व नसताना वडिलांच्या नावावर सुरक्षित असलेला मतदारसंघ ही त्यांना जिंकता आला नाही, त्यांनी बोलू नये, असा घणाघात रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर केला आहे.
त्यांच्या या टीकेला आता रोहिणी खडसेंनी जोरदार प्रत्त्युत्तर दिल. ‘रूपाली चाकणकर ह्या बाप बदलणांऱ्या सारख्या आहेत’ असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे. “रूपाली चाकणकर यांना बाप बदलणं सोपं आहे. आधी पवार साहेबांसोबत होत्या, नंतर सुप्रिया सुळे. ज्या जनतेने सर्व दिलं, त्या जनतेच्या होऊ शकत नाहीत, त्या आपल्या काय होतील?” अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकरांवर टीका केली. “माझ्या वडिलांच्या वारशावर मी सध्या काम करते, याचा मला अभिमान आहे. माझ्या वडिलांचा वारसा घेऊनच मी पुढे गेली आहे” असं रोहिणी खडसे म्हणाल्या.
“तुमच्या नेहमीच्या वक्तव्याबाबत खाली येत असलेल्या कमेंट एकदा वाचा. मग तुम्हाला तुमचं अस्तित्व कळेल. ज्यांचं नगरपालिकेत डिपॉझिट जप्त झालंय अशा लोकांचा जनाधारक शिल्लक राहिलेला नाहीय. रूपाली चाकणकरांच्या वक्तव्याला मी फार महत्त्व देत नाही” असं रोहिणी खडसे म्हणाल्या. “रूपाली चाकणकर ह्या शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने सध्या पद भोगत आहेत. शरद पवार साहेबांच्या भरोशावर आतापर्यंत पद यांना मिळत आली आहेत” असं रोहिणी खडसे म्हणाल्या.















Discussion about this post