जळगाव | राज्यातील काही भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. तर काही भागात अद्यापही पाऊस धुमाकूळ घालत आहे. हवामान खात्याने आजही राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. जळगाव जिल्ह्याला देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
मागील दोन तीन दिवसापासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. या धुवांधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने आजही विदर्भातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
आज (ता. ११) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्राच्या नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, पूर्व विदर्भातील अमरावती, नागपूर जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उद्यापासून (ता. १२) राज्याच्या बहुतांश भागात पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर जिल्ह्यामध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्येही विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.















Discussion about this post