लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या गोटात जोरदार घडामोडी सुरु आहेत. महाविकास आघाडीत अद्याप जागा वाटप झाली नसली तरी अशातच मुंबईत ठाकरे गटाच्या संभाव्य 22 उमेदवारांची नावं समोर आली आहे. एका मराठी वृत्तवाहिने संभाव्य 22 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली.
मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत. या जागांपैकी शिवसेना ठाकरे गट 20 ते 22 जागांवर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. यातच आता 22 संभाव्य उमेदवारांची यादी समोर आलीय. या यादीत विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. तसेच नवीन तरुणांनादेखील या यादीत संधी दिली जाताना दिसत आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीदेखील याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित यादी संभाव्य आहे. तरुणांना संधी दिलीच पाहिजे आणि जुने जाणते लोकं त्यामध्ये असणं जरुरीचं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने गेल्या विधानसभा निवडणुकीत 14 जागांवर विजय मिळवला होता. मुंबई हा ठाकरेंचा बालेकिल्ला आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे तीन जागा जिंकल्या होत्या. तर चौथ्या जागेवर निसटता पराभव झाला होता. त्यामुळे ठाकरेंचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक ही ठाकरे गटासाठी जास्त महत्त्वाची आहे.
संभाव्य उमेदवारांची यादी
वरळी मतदारसंघ – आदित्य ठाकरे
दहिसर – तेजस्विनी घोसाळकर
वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई
दिंडोशी – सुनील प्रभू
विक्रोळी – सुनील राऊत
अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके
कलिना – संजय पोतनीस
कुर्ला – प्रविणा मोरजकर
वडाळा – श्रद्धा जाधव
जोगेश्वरी- अमोल कीर्तिकर
चारकोप – नीरव बारोट
गोरेगाव – समीर देसाई
भांडूप – रमेश कोरगांवकर
चांदिवली – ईश्वर तायडे
दादर-माहिम – सचिन अहिर, विशाखा राऊत
वर्सोवा – राजू पेडणेकर/ राजूल पटेल
शिवडी – अजय चौधरी/ सुधीर सालवी
भायखळा – किशोरी पेडणेकर/ जामसुतकर/ रहाटे
चेंबूर – अनिल पाटणकर/ प्रकाश फार्तेपेकर
अणुशक्तीनगर – विठ्ठल लोकरे / प्रमोद शिंदे
घाटकोपर – सुरेश पाटील
मागाठाणे – विलास पोतनीस / सुदेश पाटेकर/ संजना घाडी















Discussion about this post