बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे या भरतीला सुरुवात झाली आहे. पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा.
ही भरती प्रक्रिया पंजाब अँड सिंध बँकेमार्फत राबविली जात आहे. या भरतीद्वारे विविध पदे भरली जाणार आहे. या नोकरीसाठी बँकेने अधिसूचना जाहीर केली आहे.
पंजाब अँड सिंध बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२४ आहे. या भरती प्रक्रियेत २०३ पदे भरण्यात येणार आहे. ही नोकरी अधिकारी पदासाठी आहे. या भरती मोहिमेत JMGS-I,MMGS-II,MMGS-III, SMGS-IV ग्रेड्स पदे भरती केली जाणार आहे.
या नोकरीसाठी इच्छुक उमेदवार punjabsindbank.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करताना ८५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदावारांना १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परिक्षेच्या आधारे केली जाणार आहे.त्यानंतर उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
अर्ज कसा करायचा?
सर्वप्रथम punjabsindbank.co.in या वेबसाइटवर जा.
त्यानंतर होमपेजवर Recruitment वर क्लिक करा.
यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करु शकतात.
यानंतर तुम्ही आवश्यक माहिती भरुन कागदपत्रे अपलोड करा. यानंतर अर्ज शुल्क भरावे.
या फॉर्मची प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवा.















Discussion about this post