धुळे । धुळ्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शिंदखेडा तालुक्यातील दभाषी शिवारातून वाहणाऱ्या तापी नदीवरील पुलावरुन उडी घेत माजी नगरसेवक देवेंद्र सोनार यांच्या पत्नी श्रेया सोनार यांनी आत्महत्या केली. श्रेया देवेंद्र सोनार (वय २९, रा. सुभाष नगर, ग. न. ९, जुने धुळे) असे नाव आहे. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला. पण उपयोग झाला नाही
दभाषीजवळील तापी नदीवरील पूलावर काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या एका महिलेने दुचाकी पुलावर उभी करून नदीत उडी घेतली. हा प्रकार एकाने बघितल्यावर त्याने पोलिसांना कळवले. या वेळी पोलिस अधिकारी नीलेश मोरे यांचे पथक गस्तीवर होते. ते घटनास्थळी आले. पुलावरील दुचाकीच्या डिकीत आधार कार्ड आढळले. त्यावर श्रेया देवेंद्र सोनार असे नाव होते.
सात वर्षापूर्वी विवाह :
पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे श्रेया यांचे माहेर होते. सुमारे ७ वर्षापूर्वी त्यांचा विवाह देवेंद्र सोनार यांच्यासोबत झाला. या दाम्पत्याला दोन लहान मुले आहे. दाम्पत्यात कोणताही वाद नव्हता, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली. त्यानंतरही श्रेया यांनी टोकाचे पाऊल का उचलले हे स्पष्ट होऊ शकले नाही.















Discussion about this post