जळगाव | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत संलग्न महाविद्यालय, परिसंस्था आणि शैक्षणिक प्रशाळा यामधील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता अभ्यासक्रम प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
बहुतांश विद्यार्थी, विद्यार्थिनींकडून अतिपर्जन्यवृष्टी झाल्याने तसेच शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्याचे कारण देऊन महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी प्राचार्यांकडे केली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालय, परिसंस्था आणि शैक्षणिक प्रशाळा यांत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता यापूर्वी दिलेली १० ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ आता ३१ ऑगस्टपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी कॉलेजात जाऊन प्रवेश घ्यावे, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.















Discussion about this post