सांगलीमधील कवठेमहांकाळमध्ये शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडलीय. मात्र, रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने गोळीच उडाली नाही. ही संपूर्ण घटना मात्र हल्ल्याचा प्रयत्न झालेल्या ठिकाणातील सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. हल्लेखोरांनी मात्र या प्रकारानंतर धूम ठोकली आहे.
कवठेमहांकाळ येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते दिनकर पाटील यांचा पुतण्या अभिजित पाटील याच्यावर अज्ञात तरुणाने गोळीबाराचा प्रयत्न झालाय. मात्र, रिव्हॉल्व्हर लॉक झाल्यामुळे गोळी उडाली नाही. रात्री कवठेमहांकाळ शहरातील एका मोबाइल शॉपीमध्ये हा प्रकार घडला आहे. घटनेची शनिवार १० ऑगस्ट रोजी रात्री घडली. परंतु, उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद नव्हती.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते दिनकर पाटील यांचे बंधू युवराज पाटील यांचे अभिजित पुत्र आहेत. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते तहसील कार्यालयासमोरील एका मोबाइल दुकानात आले होते. यावेळी एका अज्ञाताने दुकानात प्रवेश करीत रिव्हॉल्व्हरमधून त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. पण रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने गोळी उडाली नाही. यामुळे अभिजित थोडक्यात बचावल्याचं समोर आलंय. सीसीटीव्हीमध्ये हा संपूर्ण थरार दिसत आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे. पोलीस हल्लेखोराचा शोध घेत असल्याची माहिती मिळत आहे.















Discussion about this post