राज्य सरकारनं महिलासांठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहे. या योजनेचे फॉर्म भरले जात असून या योजनेचे पैसे कधी येणार? याबाबत महिलांच्या मनात उत्सुकता आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
राज्य सरकारकडून येत्या रक्षाबंधनाच्या आधी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैसे देण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दरम्यान अजित पवारांनी राज्यभरातील महिलांना महत्त्वाची माहिती दिली. “आम्ही अनेक योजना या जनतेसाठी आणल्या आहेत आणि या योजना आणताना मी अभ्यास केला आहे. शेतकऱ्याला त्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. त्यामुळे आम्ही काम करत आहोत. नाशिकमध्ये आमचं आज उत्साहात स्वागत करण्यात आलं आहे. आता इथे मला काही बहिणींनी राखी बांधली.
रक्षाबंधन साजरा केला. या रक्षाबंधनाच्या निमित्त आम्ही या राज्यातील सर्व महिलांना लाडकी बहीण योजना आणली आहे. गरीब महिलांकरिता ही योजना आम्ही आणली आहे. ही योजना राबवायला मी कुठही कमी पडणार नाही हा शब्द तुम्हालक देत आहे. येत्या 17 तारखेला जुलै आणि ऑगस्टचे पैसे खात्यात जमा होणार आहेत”, अशी महत्त्वाची माहिती अजित पवारांनी दिली.















Discussion about this post