मुंबई: अलीकडच्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीची चमक वाढली होती. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसला होता. मात्र आता सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या लोकांसाठी गुडन्यूज.
गेल्या चार दिवसापासून सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. वायदे बाजारात सोन्या आणि चांदीच्या किंमतीत आज घसरण नोंगवली आहे. दोन्ही मौल्यवान धातूच्या फ्युचर्स किमती घसरणीसह ओपन झाल्या. दरम्यान, दोन्हीच्या किमतीत लक्षणीय घसरण झाली. सध्या सोन्याचा वायदा ६८,६३९ रुपयांच्या आसपास तर चांदीचे वायदे ८१,९०० रुपयांच्या आसपास व्यवहार करत होते.
सोने-चांदीचे वायदे
सोन्या आणि चांदीचे वायदे आज हिरवळीत ओपन झाले. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा ऑक्टोबर वायदा ३१० रुपयांच्या वाढीसह ६९,९०० रुपयांवर उघडला तर चांदीच्या फ्युचर्सच्या किंमत MCX वर ८१,९०० रुपयांवर ओपन झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी घसरण झाल्यानंतर आज सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली. दुसरीकडे सराफा बाजारात मात्र सोन्या आणि चांदीच्या किंमतीत मोठी घट नोंदवली गेली आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत ६३,४९० तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ६८,६३९ रुपये आहे.















Discussion about this post