नंदुरबार : नंदुरबार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबिक वाद विकोपाला जाऊन रागाच्या भरात शालकाने मेहुण्याच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून हत्या केली. यानंतर मृतदेह शेत शिवारात फेकून दिल्याची घटना नंदुरबार शहर लगत असलेल्या भोणे शिवारात घडली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
नंदुरबार शहरात राहणाऱ्या मिथुन वळवी याचे आपल्या शालका सोबत कौटुंबिक वाद सुरु होता. दरम्यान त्यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर झालेल्या वादावादी शालकाने मेहुण्याच्या डोक्यावर वार करून हत्या (Crime News) करण्यात आली. यानंतर मृतदेह भोने शिवारात असलेल्या फटाक्याच्या फॅक्टरीच्या मागील बाजूस टाकून देण्यात आला होता. मात्र परिसरातील नागरिकांना मृतदेह दिसून आल्यानंतर खळबळ उडाली होती. याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या योग्य त्या सूचना केल्या आहेत. तपासादरम्यान या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे.















Discussion about this post