मुंबई । शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाही, असं मोठं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे..
काही मराठा आंदोलकांनी मातोश्रीवर जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, याबाबत राऊतांना प्रश्न विचारला होता. यावर बोलताना राऊत म्हणाले की, ही सगळी भाजपची कारस्थानं आहेत.राज्यात सत्तांतर घडवावं लागेल असेही राऊत म्हणाले. तसेच सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांवर ताबडतोब खटले दाखल करावे असेही राऊत म्हणाले.
मनोज जरांगे पाटील हे एक स्वतंत्र विचारांचे गृहस्थ आहेत. ते अजून राजकारणात आले नाहीत. ते त्यांच्या समाजासाठी संघर्ष करत आहेत. त्यांचे प्रश्न आम्हालाही माहित आहेत असे राऊत म्हणाले. या देशात लोकशाही आहे कोणीही निवडणूक लढवू शकतो. म्हणून जरांगे पाटील यांनी काही भूमिका घ्यायची असेल तर ते घेऊ शकतात, भारतीय राज्यघटनेने त्यांना अधिकार दिल्याचे संजय राऊत म्हणाले.















Discussion about this post