भुसावळ : उन्हाळी सुट्ट्यानंतर आता शाळांना सुरुवात झाली आहे. मात्र, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याकडे गावठी कट्टा आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली. अकलूद येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील ९वीच्या वर्गात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्याकडे गावठी कट्टा आढळून आला. यानंतर शिक्षकांनाही धक्का बसला.
ही घटना शुक्रवार, 14 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी संशयित विद्यार्थ्यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अत्यंत प्रतिष्ठीत शाळेतील विद्यार्थ्याकडेच गावठी कट्टा आढळल्याने या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे तर या विद्यार्थ्याने हा कट्टा कुठून वा का आणला? या बाबीचा फैजपूर पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दप्तर तपासणीत आढळला कट्टा
भुसावळातील एका भागातील रहिवासी असलेल्या कर्मचार्याचा मुलगा अकलूदजवळील पोदार शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेतो. शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी शाळा भरल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केल्यानंतर नववीच्या एका विद्यार्थ्याकडे गावठी कट्टा आढळल्यानंतर शिक्षकांनाही धक्का बसला.
Discussion about this post