जळगाव । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून यासाठी भेटी गाठी सुरु देखील आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार जळगाव दौऱ्यावर असता त्यांची काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील अनेक पदाधिकार्यांनी भेट घेतली.
शरद पवार आणि डॉ. उल्हास पाटील यांची तब्बल चार वर्षानंतर एकत्रित भेट झाली. या भेटीत शरद पवार यांनी ‘डॉक्टर काय सुरु आहे?’ अशी विचारपूस केली. तसेच त्यांनी ‘तयारी सुरु ठेवा’ असा सूचक सल्ला देखील डॉ. उल्हास पाटील यांना दिला.आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोघांमधील भेट आणि राजकीयहस्तांदोलनाने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
यावेळी उपस्थित नेत्यांमध्ये हास्याचे फवारे देखील उडाले. २०१९ मध्ये डॉ. उल्हास पाटील यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी ऑफर देण्यात आली होती. मात्र डॉ. उल्हास पाटील यांनी नम्रपणे त्यास नकार दिला होता. हे सारे असले तरी आगामी काळात होणार्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने शरद पवार आणि डॉ. उल्हास पाटील यांच्यातील या भेटीची जिल्हाभरात चर्चा रंगली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार अरुणभाई गुजराथी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार हे उपस्थित होते.
Discussion about this post