मुंबई । राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. अशातच मनोज जरांगे पाटलांनी भाजप नेते प्रवीण दरेकरांवर गंभीर आरोप केलाय. मला कधीही जेलमध्ये टाकू शकतात, असा खळबळजनक दावा जरांगेंनी केलाय. स्वतःच्या स्वार्थासाठी जातीला मारनारे , मारेकरी तुम्ही दोन नंबरला आहात, असा खोचक टोला त्यांनी दरेंकरांना लगावला आहे.
दरेकर तुम्ही किती शातीर आहे, किती मारेकरी आहे, हे मला आंतरवालीत बसून माहिती आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. ते जालन्यातून माध्यमांशी संवाद साधत होते.
यावेळी बोलताना जरांगे पाटलांनी सांगितलं की, माझ्या विरोधात अभियान सहा महिन्यापासून सुरू केलंय. मला निवडणुकीच्या अगोदर किंवा नंतर गुंतवणार आहेत. दरेकर मराठ्यांच्या लोकांना आमिष देवून फोडत असल्याचा आरोपही जरांगे पाटलांनी केलाय.















Discussion about this post