पुणे । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेकदा मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली. मात्र, उपमुख्यमंत्रीपदावर सर्वाधिक वेळा विराजमान होण्याच रेकॉर्ड अजित पवार यांच्याच नावावर आहे. दरम्यान, अजित पवार यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी असता. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस आजच साजरा केला.
यावेळी पिंपरी-चिंचवडमधील अजित पवार यांच्या समर्थकांनी अनोखा केक आणला. केक कापल्यानंतर अजित पवारांनी केक खाल्ला. यावेळी केकवरील मजकूर वाचून अजितदादांच्या चेहऱ्यावरील उमटलेले स्मित हास्य देखील लपून राहिले नाही.
अजित पवार यांच्याप्रमाणे त्यांच्या समर्थकांनाही दादांनी मुख्यमंत्री व्हावे, अशीच मनोकामना केली आहे. या केकवर लिहिले होते, “मी अजित आशा- अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…”, आता या केकची चांगली चर्चा पुणे शहरात रंगली आहे.















Discussion about this post