नांदेड । येत्या दोन तीन महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहे. मात्र त्यापूर्वी भाजपला एका पाठोपाठ धक्का बसताना दिसत आहे. अशातच भाजपला मराठवाड्यात आणखी एक मोठा धक्का बसणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर आज शेकडो कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड येथे सायंकाळी ४ वाजता हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. माधवराव किन्हाळकर यांचा नांदेडमध्ये तगडा जनसंपर्क आहे.
त्यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर शरद पवार यांची ताकद आणखीच वाढणार आहे. काही दिवसांपूर्वी किन्हाळकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आपण शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं माधवराव किन्हाळकर यांनी स्पष्ट केलं आहे. विशेष बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांनी भाजपाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता.















Discussion about this post