जामनेर | महिलेच्या पती व मुलांना जीवेठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर शेतात अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी १८ जुलै रोजी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे.
जामनेर तालुक्यातील एका गावात विवाहिता हि पती आणि मुलांसह राहायला असून शेती व्यवसाय करतात. २१ जुन रोजी दुपारी ३ वाजता महिला शेतात काम करीत असतांना व तिचे पती हे बियाणे घेण्यासाठी आणि मुलांना शाळेतून आणण्यासाठी शेतातून गावात निघून गेले. त्यावेळी त्यांच्या गावात राहणारा शंकर रमेश धनगर रा. जामनेर याने महिला एकटी असल्याचा फायदा घेऊन तिला व तिच्या पतीला मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला.
हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने पहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी शंकर धनगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील हे करीत आहे.















Discussion about this post