मुंबई । राज्यातील विधानसभा निवडणुका आता दोन तीन महिन्यावर येऊन ठेपले असून याच दरम्यान सध्या सर्वच राजकीय पक्षात इनकमिंग आऊटगोईंग सुरु आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले वंचित आघाडीतील पुण्याचे दिग्गज नेते वसंत मोरे हे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. वसंत मोरेंसह राज ठाकरेंच्या मनसेचे तब्बल २३ नेते आणि काही पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला रामराम केला. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. शरद पवार यांची भेटही घेतली होती. मात्र, ही जागा कॉंग्रेसकडे गेल्याने येथून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली. पण, त्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.
आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे ठाकरे गटाच्या पक्षात प्रवेश करत आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वसंत मोरे पक्षप्रवेश करणार आहेत. त्यांच्यासह मनसेचे १७ शाखाअध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष, १ शहराध्यक्ष, पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी, माथाडीचे पदाधिकारी प्रवेश करत आहेत















Discussion about this post