Sunday, May 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव क्रीडा संकुलनाबाबत आ. सत्यजीत तांबेंची सरकारकडे विचारणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 8, 2024
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
0
जळगाव क्रीडा संकुलनाबाबत आ. सत्यजीत तांबेंची सरकारकडे विचारणा
बातमी शेअर करा..!

– क्रीडा संकुलनाचे काम अत्यंत संथ गतीने सुरु

– क्रीडा संकुलनासंदर्भात बैठक घेण्याची मागणी

राज्यातील क्रीडा धोरण २००१ साली तयार झाले. त्यानंतर प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक महसुली विभागात क्रीडा संकुलन निर्माण करण्याचा निर्णय २००३ साली झाला. राज्याच्या क्रीडा संकुल बालेवाडी येथे करण्यात आलं त्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असले तरी नाशिक विभागाचे क्रीडा संकुल जळगाव मध्ये बांधण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु याचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. यासंदर्भात एक बैठक घेऊन काम वेगाने सुरु करण्याची मागणी आमदार सत्यजीत तांबे सभागृहात केली.

प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात, विभागीय पातळीवर एक क्रीडा संकुलन निर्माण करण्याचा निर्णय झाला असून देखील जळगाव जिल्ह्याचे क्रीडा संकुलन जळगाव मध्ये उभारण्यात येणार होते परंतु अद्यापही याचे काम पूर्ण झालेले नाही.
जळगाव येथील क्रीडा संकुलनासाठी ३६ एकर जागा देण्यात आली, तसेच २४० कोटी रुपयांचा निधी देखील देण्यात आला. नोव्हेंबरमध्ये या क्रीडा संकुलनाचा आराखडा तयार करण्यात आला असून विविध विभागातील कर्मचारी देखील नेमण्यात आली. परंतु हे काम ज्या वेगाने होणे अपेक्षित होते त्या वेगाने होत नाहीये. त्यामुळे याचा निधी वाढत चालला आहे म्हणून या क्रीडा संकुलनाचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार? असा प्रश्न आमदार तांबे यांनी विचारला.

उत्तर महाराष्ट्रातील विशेषतः आदिवासी भागातील धुळे, नंदुरबार विभागातील मुला मुलींची क्रीडा क्षेत्रात रुची वाढवण्यासाठी आणि त्यांच्या खेळण्याची व्यवस्था करण्यासाठी हे काम वेगाने पूर्ण व्हावे यासाठी अधिवेशन संपण्याआधी माननीय जिल्हाधिकारी जळगाव, प्रधान सचिव क्रीडा, आयुक्त क्रीडा मंत्री यांच्या उपस्थितीत हे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी बैठक घेण्यात यावी अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली .

आमदार सत्यजीत तांबेंच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री दादा भुसे म्हणाले की, नाशिकमध्ये एक क्रीडा संकुल असून, जळगाव येथील क्रीडा संकुल हे अतिरिक्त क्रीडा संकुल म्हणून बांधण्याची मान्यता देण्यात आली होती. त्यासाठी १४.५ हेक्टर जागेची मान्यता देण्यात आली. प्रचलित नियमानुसार विभागीय क्रीडा संकुलनासाठी ५० कोटीचा निधी देण्यात येतो, परंतु हा प्रकल्प २४० कोटींचा असल्यामुळे त्याला तांत्रिक मंजुरीची आवश्यकता आहे. क्रीडा विभागाला हा प्रस्ताव ७ जून २०२४ रोजी देण्यात आला. त्यावेळी आचारसंहिता असल्यामुळे याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. परंतु हा प्रस्ताव हाय पावर कमिटीकडे जाईल आणि हे अतिरिक्त क्रीडा संकुल असल्यामुळे कॅबिनेट कडून मान्यता घेऊन यावर शासन वेगाने काम सुरु करणार असल्याचे दादा भुसे म्हणाले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आता बांधकाम व्यावसायिक मालमत्ता खरेदीदारांची फसवणूक करू शकणार नाहीत!

Next Post

वाहनधारकांच्या खिशाला फटका! राज्यात सीएनजीच्या दरात वाढ, आजपासून नवीन दर लागू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
खुशखबर… CNG, PNG च्या किमतीत घट; किती रुपयांनी स्वस्त झाले?

वाहनधारकांच्या खिशाला फटका! राज्यात सीएनजीच्या दरात वाढ, आजपासून नवीन दर लागू

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तामिळनाडूमध्ये आजपासून ‘विजय राज’ ; मुख्यमंत्र्यांची शपथ घेताच तीन महत्त्वाच्या फाईल्सवर केली स्वाक्षरी

तामिळनाडूमध्ये आजपासून ‘विजय राज’ ; मुख्यमंत्र्यांची शपथ घेताच तीन महत्त्वाच्या फाईल्सवर केली स्वाक्षरी

May 10, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जामनेरमध्ये आयपीएल सट्ट्याचा मोठा भांडाफोड; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

May 10, 2026
जळगावच्या एम.जे. कॉलेज परिसरातील सायबर कॅफेंवर पोलिसांची ‘रेड’; ३ कॅफे चालकांवर गुन्हे

जळगावच्या एम.जे. कॉलेज परिसरातील सायबर कॅफेंवर पोलिसांची ‘रेड’; ३ कॅफे चालकांवर गुन्हे

May 10, 2026
मी राजीनामा देण्यास तयार ; ममता बॅनर्जींचं मोठं वक्तव्य; काय म्हणाल्या? वाचा…

मी स्वत: वकील…; आता ममता बॅनर्जींचे भाजपविरोधात एल्गार; केली मोठी घोषणा

May 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page