जळगाव । महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून आज सोमवारी जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील इतर भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
तसेच मुंबईसह परिसरात देखील आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळं नागरिकांनी पावसाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
जळगाव जिल्ह्यात देखील पाऊस कोसळत आहे. आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु असून मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तविला आहे.















Discussion about this post