धुळे : दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीवर विळ्याने वार केल्यांनतर डोक्यात बॅटरी टाकून तिची हत्या केल्याची घटना धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर परिसरात घडली.
पिंपळनेरपासून जवळ असलेल्या धामणधर गावात ही घटना घडली असून, धाकलू चुनीलाल गायकवाड असे मारेकरी पतीचे नाव आहे. सायंकाळी पत्नीने दारू पिऊन आलेल्या पतीला जाब विचारल्याचे रागातून ढकलू गायकवाड याने घरात असलेल्या धारदार भाजी कापण्याच्या विळ्याने पत्नीवर वार केले. त्यानंतर घरात असलेली अवजड चार्जिंगची बॅटरी देखील मद्यपी पतीने पत्नीच्या डोक्यात मारल्याने या घटनेत पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
रात्री नशेच्या भरात पतीने हे कृत्य केल्यानंतर झोपी गेला. परंतु रात्रभर घरात रक्ताच्या थारोळ्यात पत्नी तशीच पडून होती. दरम्यान आजूबाजूच्या नागरिकांना ही बाब सकाळी समजताच त्यांनी तिच्या नातेवाईकांना याबाबतची माहिती दिली, त्यानंतर मृत महिलेच्या भावाने घटनास्थळी धाव घेत बहिणीला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याबाबत पिंपळनेर पोलिसांनी तात्काळ मारेकरी पतीच्या मुसक्या आवळल्या असून त्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















Discussion about this post