जळगाव | अमळनेर दंगल प्रकरणात अटकेत असलेला संशयित आरोपी व माजी नगरसेवक यांचा मुलगा अशफाक सलीम शेख ( वय ३३, रा. दर्गा मोहल्ला अमळनेर) याचा बुधवारी जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. यांनतर अमळनेरात सतर्कता पाळण्यात येत असून कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अमळनेर शहरात काही दिवसांपूर्वी दोन लहान मुलांच्या भांडणाचे पर्यावसान दोन गटांमधील तुफान दगडफेकीत झाले होते. यात दोन्ही गटातील संशयितांच्या विरूध्द गुन्हे दाखल केल्यानंतर धरपकड करण्यात आली होती. यातच, अमळनेरचे माजी नगरसेवक सलीम टोपी यांचा मुलगा अशफाक सलीम शेख याचा देखील समावेश होता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीत असतांनाच त्याची प्रकृती खालावल्याच्या कारणावरून त्याला म्हणजेच १३ जून रोजी पहाटे जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, अशफाक शेख याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांनाच सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्याने शेवटचा श्वास घेतला. अशफाकच्या मृत्यूची वार्ता पसरल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून अमळनेरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहेत. तर या प्रकरणी कोणत्याही अफवांना थारा देऊ नका असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
Discussion about this post