दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे.पिंपरी चिचवड महानगरपालिकेमार्फत काही रिक्त पदांवर भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाद्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. १८ ते ४३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. २ महिन्यांच्या कालावधीसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
ब्रिडींग चेकर्स या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. ५६ रिक्त पदे भरण्यात येणार आहे. ३ जुलै ते ११ जुलैपर्यंत तुम्ही कधीही हा अर्ज वैद्यकीय विभाग, दुसरा मजला आवक-जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, भवन, पिंपरी-४११ ०१८ या पत्त्यावर पाठवू शकतात.
या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवाराने वयाचा पुरावा, पदवी प्रमाणपत्र, कामाच्या अनुभवाचा पुरावा, निवासी पुरावा, उमेदवाराचा फोटो या गोष्टी दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.www.pcmcindia.gov.in या वेबसाइटवर सर्व माहिती दिली आहे.
या नोकरीसाठी दिवसाच्या आधारे पगार दिला जाईल. दरदिवशी ४५० रुपये पगार म्हणजेच तुम्ही महिन्यातून २५ दिवस काम केले तर तुम्हाला ११,२५० रुपये मानधन मिळेल.















Discussion about this post