पुणे । राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरू होणार असून परीक्षांसाठीचे प्रवेशपत्र गुरूवारी उद्या म्हणजेच ४ जुलैपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारावीच्या पुरवणी परीक्षेचे आयोजन १६ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे. दहावीच्या पुरवणी परीक्षेचे आयोजन १६ जुलै ते ३० जुलै या दरम्यान करण्यात आले आहे. कोणतेही शुल्क न घेता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी प्रवेशपत्राची मुद्रित प्रत विद्यार्थ्यांना देण्याची सूचना राज्य मंडळाचे प्रभारी सचिव शैलेंद्र पाटील यांनी केली आहे.
महत्वाचे म्हणजे, जुलै-ऑगस्ट या महिन्यांदरम्यान होणाऱ्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्रे सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी मुद्रित करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. प्रवेशपत्राची मुद्रित प्रत देण्यासाठी कोणतीही वेगळी फी घेतली जाणार नाही. त्यामुळे कोणतेही शुल्क न घेता विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.















Discussion about this post