Monday, March 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

रक्षा खडसेंचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवांना निवेदन ; केली ही मागणी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 3, 2024
in राष्ट्रीय
0
रक्षा खडसेंचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवांना निवेदन ; केली ही मागणी
बातमी शेअर करा..!

जळगाव | आधी भुसावळ येथून सुटणारी भुसावळ पुणे हुतात्मा एक्स्प्रेस आता अमरावती येथून सुटत असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ही गाडी भुसावळ येथून पुन्हा सुरु करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे. अशातच पुणे ते भुसावळ एक्सप्रेस गाडी होण्याची शक्यता असून यासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे रेल्वे मंत्री अश्‍वीनी वैष्णव यांच्याशी भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले.

भुसावळ-पुणे-भुसावळ नवीन रेल्वे सुरु करणे, रावेर लोकसभा क्षेत्रांतर्गत असणार्‍या रेल्वे स्टेशनवर विविध एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देणे आणि आधी सुरु असलेल्या व कोविड कालावधीत थांबा रद्द केलेल्या गाड्यांना पुन्हा थांबा देणे बाबत, तसेच दरवर्षी प्रमाणे आषाढी एकादशी निमित्त अनआरक्षित मोफत विशेष आषाढी रेल्वे साठी आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन मागणी केली.

जळगाव तसेच बुलढाणा जिल्ह्यातील अनेक नागरिक पुणे येथे स्थायिक असून, कामानिमित्त जाणार्‍यांची संख्या सुद्धा खूप असल्याने भुसावळ-पुणे रेल्वे सुरु करणे बाबत प्रवाश्यांची अनेक दिवसापासून मागणी होती. या अनुषंगाने सदर भुसावळ-पुणे-भुसावळ रेल्वे लवकर सुरु करण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे यांनी आज रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी बोदवड स्टेशन येथे नवजीवन (१२६५५/१२६५६), सुरत-अमरावती (२०९२५/२०९२६), आजाद हिंद (१२१२९/१२१३०), नांदुरा स्टेशन येथे हैद्राबाद-जयपूर सुपरफास्ट (१२७१९/१२७२०), प्रेरणा एक्स्प्रेस (२२१३७/२२१३८), गरीबरथ (१२११३/१२११४), रावेर स्टेशन येथे महानगरी (२२१७७/२२१७८), निंभोरा स्टेशन येथे अमृतसर एक्सप्रेस (११०५७/११०५८), भुसावळ स्टेशन येथे राजधानी एक्सप्रेस टेक्नीकल हाल्ट (२२२२१/२२२२२) तर मलकापूर स्टेशन येथे अमरावती एक्स्प्रेस (२२११७/२२११८), गरीबरथ (१२११३/१२११४) आदी रेल्वे गाड्यांना थांबा देणे बाबत चर्चा केली.

याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्फत आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर जाणार्‍या भक्तांसाठी दरवर्षी प्रमाणे दि.१६ जुलै जाण्यासाठी व दि.१७ जुलै परत येण्यासाठी भुसावळ-पंढरपूर-भुसावळ अनआरक्षित मोफत विशेष आषाढी रेल्वे गाडी उपलब्ध करण्यासाठी देखील याप्रसंगी चर्चा करण्यात आली. यावर रेल्वे मंत्र्यांनी अनुकुलता दर्शविली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पंढरपूरच्या वारीला लागली राजकारणाची चाहूल ; शरद पवारांचे राहुल गांधींना निमंत्रण

Next Post

10वी-12वीच्या पुरवणी परीक्षेची तारीख जाहीर; घ्या जाणून तारीख..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ ; अशी आहे वाढीव शुल्क आकारणी

10वी-12वीच्या पुरवणी परीक्षेची तारीख जाहीर; घ्या जाणून तारीख..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

तापमान घटले, पण आर्द्रतेमुळे उकाडा कायम; जळगावकर हैराण

March 16, 2026
गॅस सिलिंडरच्या तुटवड्याबाबत छगन भुजबळांची विधीमंडळात महत्त्वाची माहिती ; वाचा काय म्हणाले?

गॅस सिलिंडरच्या तुटवड्याबाबत छगन भुजबळांची विधीमंडळात महत्त्वाची माहिती ; वाचा काय म्हणाले?

March 16, 2026
दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; जळगाव पोलिसांनी मालेगावच्या तिघांना पकडले

दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; जळगाव पोलिसांनी मालेगावच्या तिघांना पकडले

March 16, 2026
पाळधीत साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळला, ७ जण गंभीर जखमी

पाळधीत साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळला, ७ जण गंभीर जखमी

March 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page