मुंबई । राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काल शुक्रवारी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला असून त्यात घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राज्य सरकारकडून मोठं मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहे. या अर्थसंकल्पावरून शरद पवार यांनी टीका केली. खिशात 70 रुपये मग 100 रुपये खर्च करणार कसे? असा हिशेबच शरद पवारांनी काढला. हा अर्थसंकल्प म्हणजे शब्दांचा फुलोरा असल्याचे ते पत्रकार परिषदेत म्हणाले.
प्रत्यक्षात येणार नाहीत अशा गोष्टींची अर्थसंकल्पात मांडणी करण्यात आल्याचे शरद पवार म्हणाले. महसूल तूट, एकंदर लागणारी आवश्यकता, या तीन गोष्टींची आकडे बघितले तर अपेक्षापेक्षा किती तरी कमी तरतूद असल्याचे दिसून येते. एका दृष्टीने हा अर्थसंकल्प लोकांना काही तरी भयंकर करतो हे दाखविण्याचा प्रकार असल्याचा टोला पवारांनी लगावला. माझी खात्री आहे की लोकांचा यावर विश्वास नसल्याचे ते म्हणाले. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन या गोष्टी मांडण्यात आल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी कितपत होईल, यावर त्यांनी शंका घेतली.
एखाद्या गोष्टीला 100 रुपये खर्च असेल आणि माझ्या खिशात 70 रुपये असेल तर मग खर्च कसा करणार असा सवाल त्यांनी केला. तुमच्याकडे महसूली जमा किती आहे. महसूली खर्च किती होणार आहे, जरुरीपेक्षा जास्त खर्चाचा गॅप कसा भरणार हे न सांगता आम्ही करु या म्हणण्याला फारसा काही अर्थ उरत नसल्याचे ते म्हणाले. त्यांनी एकंदरीतच हा अर्थसंकल्प विधानसभेच्या तोंडावर केलेला हा शब्दांचा फुलोरा असल्याची टीका केली.















Discussion about this post