जळगाव । शेअर मार्केटमधील गुंतवणुकीबाबत ऑनलाइन मोफत मार्गदर्शन करण्याच्या नावाने जळगावातील ५६ वर्षीय प्रौढाची सहा लाख रुपयांत फसवणूक झाली होती. या प्रकरणी सायबर पोलिसांत एप्रिल महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. फसवणूक करणाऱ्या दोघांना दिल्लीतून पोलिसांनी जेरबंद केले. त्यांना जळगाव येथील न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची कोठडी मिळाली.
जळगाव शहरातील जय नगरात राहणारे हेमेंद्र राजेंद्र शर्मा या प्रौढ व्यापाऱ्याची ८ फेब्रुवारी ते ८ एप्रिल २०२४ दरम्यान राम इव्हेस्टमेंट अकॅडमीच्या नावाने गुरुराम व दिया या दोघांनी संपर्क करून व्हॉट्सअॅप लिंकद्वारे जॉइन करून घेऊन वेगवेगळे आमिष दाखवून ५,९५,००० रुपये गुंतवण्यास सांगून फसवणूक केली. ही रक्कम शर्मा यांनी वेळोवेळी विविध बँकांच्या माध्यमातून ट्रान्सफर केली. त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी २७ एप्रिल रोजी सायबर पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासात मोबाइल लोकेशनवरून पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल वसंत बेलकर, पोलिस नाईक प्रदीप चौधरी यांचे पथक दिल्ली येथे रवाना झाले होते. या ठिकाणी पटेल नगरातून दोघांना मोबाइलवरील सीडीभारच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे
सीडीआरच्या मदतीने सापळा रचून दिल्लीतील पटेल नगरातून रणजित सिंग मदनकुमार (वय ४३, रा. जहांगीरपूर, दिल्ली) व प्रवीणकुमार शाही वीरेंद्र शाही (क्य ४४, रा. अंबर हाय एक्स्टेंशन, व्दारका सेक्टर, दक्षिण दिल्ली) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोबाइल, विविध बँकांचे एटीएमस्सह त्यांना तीस हजारी कोर्टात हजर करून ट्रान्झीट रिमांड मिळवून २७ जून रोजी जळगावात आणले. त्यांना मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात हजर केले. न्यायालयाने त्यांना २ जुलैपर्यंत पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली















Discussion about this post