बंगळुरू | प्रवाशांनी भरलेल्या बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला असून यात अनेकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक लोकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. प्रवाशांनी भरलेली बस स्टेशनरीने भरलेल्या ट्रकला धडकली आणि त्यामुळे हा अपघात झाला आहे.
हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती मिळाली नाही.















Discussion about this post