जळगाव । शहरातील सरस्वती नगर येथे राहणाऱ्या ध्रुव ललित बऱ्हाटे (वय १७) या अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
ध्रुव हा सरस्वती नगरमध्ये आई, वडील, लहान भाऊ यांच्यासह राहत होता. त्याचे वडील एका हॉटेलमध्ये कामगार म्हणून तर आई भंगाळे गोल्ड येथे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. ध्रुव हा इयत्ता बारावी विज्ञान शाखेमध्ये मु.जे. महाविद्यालय येथे शिक्षण घेत होता.(केसीएन)गुरुवार दि. २७ जून रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ध्रुवचे आई-वडील हे कामाला निघून गेले.
त्यानंतर सकाळी ध्रुव हा घरी एकटाच होता. त्याने घरामध्ये एका खोलीत स्वतःला गळफास लावून घेत आत्महत्या केली. दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्याचा लहान भाऊ शाळेतून घरी आला, त्यावेळेला भाऊ दरवाजा उघडत नाही म्हणून त्याने शेजारील नागरिकांना सांगितले.(केसीएन) त्यावेळेला परिसरात राहणारे त्याचे नातेवाईक देखील आले. त्यांनी खिडकीतून पाहिले असता ध्रुव हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
त्यानंतर ध्रुव याला दरवाजा तोडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी सोसे यांनी तपासणीअंती मयत घोषित केले. यानंतर कुटुंबीयांनी एकाच हंबरडा फोडत आक्रोश केला. शासकीय रुग्णालयामध्ये नातेवाईकांची गर्दी जमा झाली होती. शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.















Discussion about this post