मुंबई : राज्य सरकारने घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी मोठी कारवाई केली असून राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (मानवाधिकार संरक्षण) कैसर खालिद यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश महाराष्ट्र सरकारने जारी केले. त्यांना पुढील आदेश येईपर्यंत तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आल्याचे म्हटले आहे
खालिद यांच्यावर मंजूर निकषांकडे दुर्लक्ष करून १२० ७ १४० चौरस फूट आकाराचे मोठे होर्डिंग्ज उभारण्यास परवानगी देऊन आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असा आरोप ठेवण्यात आला आहे. डीजीपी कार्यालयाची परवानगी न घेता स्वत:हून होर्डिंग मंजूर केले. यामध्ये प्रशासकीय त्रुटी व अनियमितता आढळून आली आहे.
खालिद यांच्या पत्नीच्या खात्यात होर्डिंगची परवानगी असलेल्या कंपनीने लाखो रुपये भरल्याचा आरोप आहे. यातून खालिद यांचे निलंबन करण्यात आले आहे.रेल्वे पोलिसांना ४०० टक्के अधिक नफ्याचे आमिष दाखवत इगो प्रायव्हेट लिमिटेडच्या माजी संचालिका जान्हवी मराठेने घाटकोपर होर्डिंगचे कंत्राट मिळविल्याचे तपासात समोर आले. अनेक महत्वाच्या पत्रव्यवहारात मराठेच्या स्वाक्ष-या असलेली कागदपत्रे विशेष तपास पथकाच्या हाती लागल्या आहेत. याच कार्यकाळात इगोकडून त्यांच्या खात्यात ३३ लाख ५० हजार रुपये व मर्सिडिज दिल्याचेही समोर आले आहे.















Discussion about this post