जळगाव । तुम्हीही शासनमान्य स्वस्त धान्य दुकानांत रेशनकार्डवर धान्याचा लाभ घेत असाल तर तुम्हाला ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. अन्यथा आपले रेशनचे धान्य बंद होऊ शकते. ही केवायसी करण्यासाठी शासनाने येत्या ३० जूनपर्यंत मुदत दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक कार्डधारकांनी अद्यापही केवायसी पूर्ण केली आहे.
शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा विभागांतर्गत रेशनकार्डची ई-केवायसी करण्याचे आदेश दिले आहेत. ही प्रक्रिया केली नसेल त्या कार्डवरील अन्नधान्याचा पुरवठा बंद होऊ शकतो. ई-केवायसीमुळे बनावट कार्डधारकांची संख्या कमी होईल.यासोबतच मृत लाभार्थीची नावे कमी होऊन सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये धान्याचे वितरण पारदर्शकपणे होईल. त्यासाठी रेशन दुकानदारांकडे आधार क्रमांक दिल्यानंतर त्यांच्याजवळील मशीनद्वारे ई- केवायसी करता येईल. विशेष
म्हणजे धान्याचे वितरण करताना रेशन दुकानदारांनी त्यांच्याकडील ग्राहकांची ई-केवायसी केलेली आहे. या प्रक्रियेसाठी अद्याप शासनाने मुदतवाढ
दिलेली नसल्याने ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही, त्या लाभार्थीचा धान्यपुरवठा बंद होईल, असे आवाहन केले आहे.















Discussion about this post