सोने आणि चांदी दरात चढ-उतार सुरूच आहे. भाव कधी एकदम वर जात आहेत तर कधी खाली येत आहे. यामुळे ग्राहकही संभ्रमात आहेत. दरम्यान आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मात्र आज चांदीच्या किंमतींची चकाकी वाढली आहे. चांदीच्या किंमतींमध्ये आज मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे आजच्या किंमतींबाबत जाणून घेऊ.
२२ – २४कॅरेट सोन्याचा भाव
आज २२ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत १०० रुपयांनी कमी झालीये. त्यामुळे आजचा भाव ६,६३,४०० रुपये इतका आहे. तर १० ग्राम सोन्याची किंमत ६६,३४० रुपये इतकी आहे. तर आज १ ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,२४६ रुपये आहे. तर १ तोळा सोन्याचा भाव ७२,४६० रुपये प्रति तोळा इतका आहे. तसेच १०० ग्राम सोन्याचा भाव ७,२४,६०० रुपये इतका सोन्याचा भाव आहे.
विविध शहरांमधील किंमती
मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,२२१ रुपये प्रति ग्राम आहे.
पुण्यामध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,२२१ रुपये प्रति ग्राम आहे.
अहमदाबादमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,२२६ रुपये प्रति ग्राम आहे.
कोलकत्तामध्ये २४ कॅरेट प्रति ग्राम सोन्याचा भाव ७,२२१ रुपये आहे.
नवी दिल्लीमध्ये २४ कॅरेट प्रति ग्राम सोन्याचा भाव ७,२४६ रुपये आहे.पटनामध्ये २४ कॅरेट प्रति ग्राम सोन्याचा भाव ७,२२६ रुपये आहे.
चांदीच्या किंमती
आज सकाळी ९ वाजता आलेल्या दरांनुसार चांदीची किंमत वाढली आहे. १ किलो चांदीचे दर १०० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे चांदीच्या किंमती ९१,६०० रुपयांवर आल्यात.
मुंबईत १ किलो चांदी – ९१,६०० रुपये
पुण्यात १ किलो चांदी – ९१,६०० रुपये
दिल्लीत १ किलो चांदी – ९१,६०० रुपये
कोलकत्तामध्ये १ किलो चांदी – ९१,६०० रुपये
मेरठमध्ये १ किलो चांदी – ९१,६०० रुपये















Discussion about this post