नीट परीक्षेचा निकाल जाहीर होताच देशभरात वाद निर्माण झाला आहे. हा वाद सुप्रीम कोर्टात गेला आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टात आज NEET-UG 2024 च्या निकालाला आव्हान देणाऱ्या तीन याचिकांवर सुनावणी झाली आहे. यावेळी नीट परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे. पूर्णपणे परीक्षा रद्द करणे योग्य नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.
४ जून रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. परीक्षेतील अनियमिततेच्या आरोपांची SIT समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी याचिकेत मागणी करण्यात आली होती. यासोबतच ४ जूनच्या निकालाच्या आधारे केले जाणारे कॉउंसलिंग बंद करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली होती. कॉउंसलिंगवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. १५६३ विद्यार्थ्यांसाठी २३ जून रोजी पुनर्परीक्षा होणार असल्याची माहिती एनटीएने न्यायालयात दिली आहे.
पूर्णपणे परीक्षा रद्द करणे योग्य नसल्याची टिप्पणी न्यायालयाने केली आहे. एनटीएला दोन आठवड्यांत याचिकांवर उत्तर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने आजच्या सुनावणीमध्ये दिलेले आहेत.
यावेळी फेरपरीक्षेची तारीख आजच ठरवली जाईल, असं न्यायालयाने म्हटलं आहे. तर कोर्टाच्या निर्देशानुसार २३ जून रोजी १५६३ विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा होणार आहे. या परिक्षेचा निकाल ३० जूनपूर्वी निकाल लावला जावा, अशा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. १५६३ विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क हे ग्रेस मार्कांशिवाय दिले जाणार आहेत. एनटीएने दिलेली माहिती कोर्टाने नाकारली आहे. बाकी २ याचिकांवर न्यायालयाने पुढील दोन आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे.















Discussion about this post