भुसावळ : उन्हाळी सुटीनंतर सीबीएसई पॅटर्नच्या शाळांना सोमवार, 12 जून रोजी सुरूवात झाली. मात्र याच दरम्यान भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शाळेचा पहिलाच दिवस ८वीच्या विद्यार्थ्याचा आयुष्याचा अखेरचा दिवस ठरला आहे. सुयोग भुषण बडगुजर (रा.प्रिमिअर हॉटेल मागे, जामनेररोड, भुसावळ) असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून त्याचा भोवळ आल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली
शहरात डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल असून या शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात सुयोग भुषण बडगुजर (भुसावळ) हा विद्यार्थी शिक्षण घेत होता. सोमवारी शाळेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थी सकाळीच शाळेत दाखल झाला मात्र शाळेच्या आवारात आल्यानंतर साडेसात वाजेच्या सुमारास त्याने मळमळ होत असल्याचे सहकारी मित्रांना सांगितले व त्याचवेळी त्याला भोवळ आली व तो खाली कोसळला.
शाळेतील शिपाई व कर्मचार्यांनी त्याला उठविण्याचे प्रयत्न करूनही हालचाल होत नसल्याने पालकांना माहिती कळवण्यात आली व तत्काळ चारचाकी वाहनाद्वारे शहरातील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले मात्र तेथे व्हेन्टीलेटर नसल्याने तेथून डॉ.राजेश मानवतकर यांच्याकडे आणण्यात आले. विद्यार्थ्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले मात्र व्हेन्टीलेटर सुरू होत नाही तोच विद्यार्थ्याची प्राणज्योत मालवली. इलेक्ट्रीक सीपीआर देवूनही उपयोग झाला नाही.















Discussion about this post