लोकसभा निवडणुकीनंतर आज रविवारी नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र, या शपथविधी सोहळ्याआधीच बुलढाणा येथील प्रसिद्ध ज्योतिष्यकार दत्तात्रय देशपांडे महाराज यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.
निवडणुकीच्या काळात अनेकजण भविष्यवाणी करतात. यातील काही अंदाज चुकीचे तर काहींचे अंदाज खरे ठरतात. आदिशक्तीचे साधक तथा बुलढाणा येथील प्रसिद्ध ज्योतिष्यकार दत्तात्रय देशपांडे महाराज यांनी काही २८ मे रोजी मोठी भविष्यवाणी केली होती. लोकसभा निवडणूक निकालात भाजपले २३५ ते २४० आणि काँग्रेसला २५५ पर्यंत जागा मिळणार असे ते म्हणाले होते.
तसेच नरेंद्र मोदी यांना सत्ता स्थापनेसाठी तडजोड करावीच लागेल, असं भाकीतही देशपांडे महाराज यांनी केलं होते. त्यांचा हा अंदाज काही प्रमाणात खरा ठरला. आता लोकसभा निकालानंतर त्यांनी पुन्हा नवीन भविष्यवाणी केली आहे.
नरेंद्र मोदी यांचं सरकार ६ महिनेही टिकू शकणार नाही, असं देशपांडे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीतही महायुतीचा धुव्वा उडेल असेही ते म्हणाले आहे. महाविकास आघाडीचे सर्वाधिक जागेवर उमेदवार निवडून येतील. अजित पवार यांच्या पक्षाचं नामोनिशाण राहणार नाही, असंही दत्तात्रय देशपांडे महाराज यांनी म्हटलं आहे.















Discussion about this post